शीर्षक नाहीपनवेलच्या सुकन्यांचे भविष्य होणार समृद्ध!
मनपा क्षेत्रातील 1000 मुलींच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळणार
आमदार प्रशांत ठाकूर स्वखर्चाने खाते उघडणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची अनोखी भेटपनवेल( प्रतिनिधी) कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 2023 मध्ये जन्मलेल्या 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे ते स्वखर्चाने एक हजार रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 


       सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात .त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना आहे. या माध्यमातून आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात . मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते      मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. तिचे भविष्यात आत्मनिर्भर व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुलींना सन्मानाने जगता यावे, त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा एक प्रमुख हेतू या पाठीमागे मानला जातो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 1 जानेवारी ते 23 जुलै 2023 या दरम्यान जन्मलेल्या 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्वतः या मुलींचे एक हजार रुपये भरून नवीन खाते उघडणार आहेत. त्यानंतर संबंधित पालकांना आपल्या मुलीच्या खात्यावर दरमहा रक्कम भरल्यानंतर मुलींना शिक्षणासाठी या बचतीचा लाभ घेता येणार आहे. 2023 मध्ये जन्मलेल्या आपल्या सुकन्येच्या समृद्ध भविष्यासाठी अमरीश मोकल यांच्याकडे    9821882007 
     या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. 


 
थोडे नवीन जरा जुने