कै,कमळु पाटील यांचा 31 वा स्मृतीदिनानिमित्त तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ




कै,कमळु पाटील यांचा 31 वा स्मृतीदिनानिमित्त तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ
पनवेल दि १५, ( संजय कदम) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांचे वडिल कै,कमळु पाटील यांचा 31 वा स्मृतीदिनानिमित्त, तालुक्यातील तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ आजच्‍या दिवशी करण्यात आला. 


                 या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास आले आहेत त्यांना बस साठी रस्तावर भर उन्हात व पावसाळ्यात उभे रहावे लागत होते ही येथील रहिवासांची गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी येथे थांबा व शेड उभारली आहे . सदर बस थांबा व शेड चे उदघाटन उपजिल्हा प्रमुख रामदासदादा पाटील, शिवसेना पनवेल म.न.पा 3 चे अध्यक्ष मिथुन मढवी , शिवसेना तळोजा शहर समन्वयक अभिमन्यू अर्जुन गोरे, तळोजा युवासेनेचे तेजस पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आले .  


थोडे नवीन जरा जुने