भाजप कामगार
आघाडी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी हरगुडे
वाघोली, दि. ७ (प्रतिनिधी)- केसनंद (ता. हवेली) येथील विजय हरगुडे यांची भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी मोर्चा 'प्रदेशाध्यक्ष ' पदी नियुक्ती झाली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आर्थिक संपन्नतेचा कुठलाही गर्व न बाळगता कार्यकर्ता म्हणून अनेक अभियानात जीव ओतून काम करणारे विजय हरगुडे यांचा राजकीय प्रवास अभिमानास्पद असून त्यांना निवडीचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजप नेते मुरलीधर मोहोळ, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा गणेश कुटे, पुणे जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव, हवेली तालुका भाजप उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सन २०१६ रोजी विजय हरगुडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
यात आषाढी वारीदरम्यानच्या इंदापूर येथे 'निर्मलवारी अभियाना'त रात्रभर सेवा दिल्यावर दमून कुठलाही कमीपणा न वाटता एका छोट्या पायरीवर विसावा घेणारा माणूस 'प्रदेशाध्यक्ष' झाला, अशी भावना भाजप कामगार मोर्चा चे मा महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली आहे.
Tags
पनवेल