एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी? सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात करण्यात आले मार्गदर्शन






एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी? सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात करण्यात आले मार्गदर्शन 




पनवेल(प्रतिनिधी) एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी? या विषयावर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सीकेटी स्वायत्त महाविद्यालयात सी.डी.देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवारी अतिथी व्याख्यान पार पडले.  




या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेचे माजी उपायुक्त आणि सी.डी. देशमुख इन्स्टिट्यूट ठाणेचे संचालक महादेव जगताप व सी. डी. देशमुख इन्स्टिट्यूट ठाणेचे समन्वयक गिरीश झेंडे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यावेळी सी. डी. देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे अध्यक्ष डॉ. जे. एम. पावरा, सी.डी.देशमुख केंद्राचे समन्वयक विजयेंद्र शितोळे, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. हरिभाऊ खरात, इतिहास विभागाचे प्रा. भावेश भोईर व सी.डी.देशमुख केंद्राच्या लिपिक मनाली परब यांची उपस्थिती लाभली.


महादेव जगताप यांनी आपल्या व्याख्यानामध्ये पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायला हवी, अभ्यासाप्रती मुलांचा दृष्टिकोन कसा असावा, एमपीएससी, यूपीएससी परीक्षांचे स्वरूप , पात्रता, टप्पे त्याचप्रमाणे अभ्यासाची पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. तर गिरीश झेंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक असे व्याख्यान केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले आणि आभार प्रदर्शन सी.डी.देशमुख केंद्राचे समन्वयक विजयेंद्र शितोळे यांनी केले.




थोडे नवीन जरा जुने