पनवेल दि.०६ (वार्ताहर) : बोलण्यामध्ये गुंतवून व्यावसायिकाला ऑनलाईन पेमेंट द्वारे ५५ हजारांचा गंडा लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने खारघर पोलिस ठाणे आणि सायबर क्राइम विभाग नवी मुंबईत तक्रार दाखल केली आहे.
खारघरमधील गुर्वी गावातील रहिवासी असलेले जनार्धन म्हात्रे यांचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. त्यांना लोखंडी गेट बसविण्याच्या नावाने एका व्यक्तीचा फोन आला. याच दरम्यान काही वेळात आणखी एका नंबरवरून फोन आला. बोलता बोलता म्हात्रे यांना त्यांच्याबाबत खासगी माहिती विचारून म्हात्रे यांच्याकडून गुगल पे चा नंबर घेण्यात आला.
ऊन
यावेळी तीन वेळा समोरच्या माणसाना म्हात्रे यांनी ५५ हजार रुपये गुगल पे द्वारे पाठवले. त्यानंतर समोरील व्यक्तीचा फोन लागला नसल्याने जनार्धन म्हात्रे यांना आपली फसवणुक झाली असल्याचे लक्षात आले. याबाबत म्हात्रे यांनी खारघर पोलिस ठाणे आणि सायबर क्राइम विभाग नवी मुंबईत तक्रार दाखल केली आहे.

Tags
पनवेल