सांगली जिल्ह्यातील आपले समाजबांधव जातीवादाच्या त्रासाला कंटाळून गांव सोडते झाले आहेत.त्यांनी तडक मंत्रालयाची वाट धरलेली आहे.आपले बांधव हाल अपेष्टा सहन करीत मोर्चाने मंत्रालयाकडे निघाले आहेत.त्यांना आपल्या परिने मदत करणे हे आपले ऐहिक कर्तव्य समजून प्रत्येकाने किमान १००-१०० रुपये जरी काढले तरी १० हजाराच्या वर रक्कम जमा होवू शकेल.आपल्या ग्रुपमध्ये १०० पेक्षा जास्त सदस्य दिसून येत आहेत.त्यामुळे एवढीरक्कम जमा करणे सहजशक्य आहे.
तरी या ग्रुपवरील माझ्या समाज बांधवांना नम्र विनंती आहे कि, आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सांगलीच्या समाजबांधवाना मदतीचा हात द्यावा.गोळा होणारा निधी संस्था प्रमुखांनी समक्ष जाऊन दिला तर अधिक उचीत होईल.
Tags
सांगली