कोन - सावळा रोडवर झालेल्या हत्येतील मयत इसमाची ओळख अद्यापही पटलेली नाही


कोन - सावळा रोडवर झालेल्या हत्येतील मयत इसमाची ओळख अद्यापही पटलेली नाही
पनवेल दि.०३ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील कोन - सावळा रोडवरील ॲग्रोवन लॉजिस्टीक कंपनीच्या समोर एक तरुणाची कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी बोथट हत्याराने डोक्यात प्रहार करून व लोखंडी साखळीने गळा आवळुन त्याचा खुन केल्याची घटना गेल्या एप्रिल महिन्यात घडली होती. मात्र अद्याप देखील सदर तरुणाबाबत पोलिसांना कोणतेही धागेदोरे सापडलेले नाही. त्यामुळे सदर तरुणाबाबत कोणास माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर तपास गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल हे करीत आहेत.  सदर मयत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याची उंची ५ फुट ८ इंच, बांधा सावळा, अंगात काळसर राखाडी रंगाचे URBAN STYLE लिहिलेली हाफ टी शर्ट , काळया रंगाची कार्गो फुल पॅट, पॅटचे खिशाजवळ Mango's असे प्रिंट केलेले, उजव्या पायात पांढच्या रंगाचा शुज घातलेले होते. सदर मयत इसमाच्या दोन्ही हातावर ब्लेडने वार केलेच्या जुन्या जखमा दिसत असून त्याच्या पॅटच्या खिशामध्ये एक बोट कंपनीचे ब्लुटुथ, विमलच्या दोन पुडया, दोन चाव्या सापडल्या आहेत. सदर तरुणाबाबत कोणाला काही अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील (मो. ९८२१६२५८००) तसेच पोहवा रूपेश पाटील (मो.८९८३५४०२२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.   

थोडे नवीन जरा जुने