करंजाडेत बेकायदेशीर अतिक्रमणावर सिडकोची कारवाई


करंजाडेत बेकायदेशीर अतिक्रमणावर सिडकोची कारवाई
पनवेल दि.१४ (संजय कदम ) : करंजाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणात वाढ झाली होती. यासंदर्भात विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षाने सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्री भवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तोडक कारवाई करण्यात आली.


 
         करंजाडे परिसरातील कॉलेज फाटा रोड, सेक्टर २, ३ आणि ४ या भागातील बेकायदेशीर अतिक्रमणे त्यामध्ये प्रामुख्याने झोपड्या, टपऱ्या, फळ व भाजीविक्रेते, कोंबडी व मटण विक्रेते आदींसह बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. यासाठी सिडको अतिक्रमण विभागातर्फे १ जेसीबी, २ डंपर, ३० पोलीस अधिकारी व कर्मचारी, २५ सिडकोचे अधिकारी व कर्मचारी आदींच्या सहाय्याने हि कारवाई पार पडली. या कारवाईचे करंजाडेमधील नागरिकांनी स्वागत केले असून अश्याचप्रकारे सातत्याने कारवाई करावी अशी मागणी सिडकोकडे केली आहे. 


थोडे नवीन जरा जुने