नफ्याचे आमिष दाखवून साडे तीन लाखांची फसवणूक
पनवेल येथील अजित चव्हाण यांना गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी हा महिलांच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडून मैत्रीची विनंती उनकरत होता आणि ओळख वाढल्यावर गुंतवणुकीचे आमिष दाखवत होता. तपासात त्याने केलेल्या ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
Tags
पनवेल