रिक्षाचालकांनी प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे - वपोनि नितीन ठाकरे


रिक्षाचालकांनी प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे - वपोनि नितीन ठाकरे
पनवेल दि.०४ (संजय कदम) : रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय करताना प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे, योग्य ते भाडे घ्यावे, एकट्या माता-भगिनींना सुद्धा त्यांच्या इच्छितस्थळी सोडावे व वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा चालकांसोबतच्या बैठकीत केले.               पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पनवेल रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा चालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन करून कोणतीही बेवारस वस्तू किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्याची संपर्क साधावा अश्या सूचना केल्या. यावेळी गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने