लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे तक्का येथील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना डेस्क किट वाटप करण्यात आले.
आय आय टी, कानपूर येथे बनवलेल्या या डेस्क किट मध्ये सॅक व लिहिण्याचे टेबल असून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होईल असा विश्वास पनवेल सरगम क्लबच्या अध्यक्षा ला. स्वाती गोडसे यांनी व्यक्त केला. यापुढे विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिबीर आयोजित करणार असल्याचे ला. स्वाती गोडसे यांनी सांगितले.
तक्का शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या सावळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन श्री. वैभव पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला ला.मानदा पंडित, ला. प्रेमेंद्र बहिरा, ला. संजय गोडसे, श्री. सतीश ठाकूर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल