भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाने केला वपोनि अनिल पाटील यांचा विशेष सत्कार


भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाने केला वपोनि अनिल पाटील यांचा विशेष सत्कार 
पनवेल दि.२२ (संजय कदम) : पनवेल तालुका पोलीस ठाणे कडून अविरत मेहनत घेऊन सातत्याने होत असलेल्या गाई चोरी च्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात यश संपादन करण्यात आले. याबद्दल भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाने आज पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व इतर सहकाऱ्यांचे आभार मानले.  पनवेल तालुक्यातील विविध भागातून शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या गायींची चोरी करणाऱ्या टोळीचा पनवेल तालुका पोलिसांना नुकताच छडा लावण्यात यश आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने मुंबई, ठाणे सह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून एका सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली होती. पनवेल तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल भारतीय गोवंश संरक्षण परिषद व हिंदू जन जागरण मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवलदार सुनील कुदळे यांची भेट घेऊन आभार केले. यावेळी ऍड नितीन केळकर, ऍड सत्यजित भोसले, परेश मुरबाडकर आदी उपस्थित होते.  थोडे नवीन जरा जुने