नवी मुंबई शहरात पार्किंगचा गंभीर प्रश्‍न भेडसावत असून जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. परिणामी वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे





नवी मुंबई सुनियोजीत शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. अनेक उद्याने, शाळा, महाविद्यालया, वीजपुरवठा, मुबलक पाणीपुरवठा अश्या अनेक सुख सुविधायुक्त विषयांत नवी मुंबई शहर स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. परंतु वाढती लोकसंख्या व त्यासोबत वाढती वाहनांची संख्या नवी मुंबईमध्ये वाहनांच्या पार्किंगची समस्या तोंड वर काढू लागली आहे. 




नवी मुंबई शहरात पार्किंगचा गंभीर प्रश्‍न भेडसावत असून जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. परिणामी वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे. असे सर्व असताना सिडकोच्या मालकी हक्काचे सध्याच्या नवी मुंबईमध्ये सर्वच रेल्वे स्थानकांच्या बाहेर नागरिकांच्या सोयीसाठी "पे अँड पार्क" अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु सानपाडा व अन्य काही ठिकाणी असणाऱ्या पार्किंगचा गैरवापर होत असल्याचे दिसुन आले. काही पार्किंगमध्ये तर अनेक वर्षांपासून अनधिकृरित्या शेकडो वाहने भंगार अवस्थेत पडल्याचे दिसून आले आहे. 



सदर भंगार वाहने पार्किंगमध्ये पडल्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित आणि धोक्यात आले असून स्वच्छ नवी मुंबई सर्वेक्षण मध्ये त्याचा परिणाम दिसून येतं आहे. पार्किंगमधल्या भंगार वाहनांमुळे पार्किंग करण्यास जागा नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी नागरीक आपली वाहने रस्त्यावर पार्क करतात त्यामुळे वाहतूक कोंडी समस्येला सामोर जावे लागत आहे.
शहरांचे निर्माते म्हणुन सिडको प्रशासनाची ओळख आहे


 परंतु पार्किंग समस्या सोडविण्यासाठी सिडको उदासीन असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. सदर पार्किंग मधील भांगर वाहने हटविण्यात यावीत व नविन वाहनांना पार्किंग सुविधेचा लाभ घेता यावा अशी कार्यवाही करावी याकरिता ई-मेल निवेदनाद्वारे सिडको आणि महानगर पालिकेला प्रशासन दिले असून या पार्किंग असलेले भंगार वाहने काढून नागरिकांना उपयोग आणि वापण्याकरिता या जागा द्याव्यात अशी मागणी
 समाजसेवक निलेश सोमाजी कचरे यांनी केली आहे


थोडे नवीन जरा जुने