स्वातंत्र्य सेनानी प्रति बँक ऑफ महाराष्ट्रने व्यक्त केली कृतज्ञता







स्वातंत्र्य सेनानी प्रति बँक ऑफ महाराष्ट्रने व्यक्त केली कृतज्ञता
पनवेल दि.२९ (वार्ताहर) : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्राने आपले सन्माननीय स्वातंत्र्य सेनानी खातेदारां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची भारतभर मोहित राबवित आहे. ह्याच अनुषंगाने नवी मुंबई झोनच्या अंतर्गत नवीन पनवेल शाखेने त्यांचे स्वतंत्र सेनानी कुटुंबीय ग्राहक श्रीमती मैनाबाई दीक्षित यांचा मोठ्या सन्मानाने त्यांच्या निवास्थानी जाऊन आदर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली व आशीर्वाद घेतला.



                 बँक ऑफ महाराष्ट्र स्वातंत्र्य सेनानींनी केलेल्या त्यागाचे मोल जाणून आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या भारत भर शाखा मधील स्वातंत्र्य सेनानींचा खातेदार व त्यांच्या कुटुंबियां प्रति त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. ह्याच अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई झोन मध्ये झोनल मॅनेजर संजयकुमार चौरासिया, उप झोनल मॅनेजर सौरभ सिंग, मुख्य प्रबंधक संगिता देसाई व बी.डी.ओ. प्रसेनजीत अंकुश यांच्या मार्गदर्शनखाली नवीन पनवेल शाखेने त्यांचे स्वतंत्र सेनानी कुटुंबीय ग्राहक श्रीमती मैनाबाई दीक्षित यांचा मोठ्या सन्मानाने त्यांच्या निवास्थानी जाऊन आदर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली व आशीर्वाद घेतला. 


याप्रसंगी नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक नम्रता कामडी व विशेष सहाय्यक अरविंद मोरे उपस्थित होते. शाखा प्रबंधक नम्रता कामडी यांनी जिव्हाळ्याने स्वातंत्र्य सेनानी कुटुंबीय श्रीमती मैनाबाई यांची खुशाली विचारून त्यांना चांगले स्वास्थ व उदंड आयुष्य लाभो अशी मनोकामना व्यक्त केली. तसेच बँके तर्फे पुस्तकरूपी भेट, बुके व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या मुलगी आशा सुदामराव दीक्षित व नातू दर्शन हसमुख दीक्षित सुद्धा उपस्थित होते. दीक्षित कुटुंबीयांनी सुद्धा बँकेने सत्कार केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रचे आभार मानले व बँकेने दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नावीन्यपूर्ण उपक्रम बँक राबवित असल्याबद्दल बँकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




थोडे नवीन जरा जुने