जासई विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.


जासई विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग. जासई ता. उरण जि. रायगड या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा आणि इयत्ता दहावी आणि बारावीत प्रथम, द्वितीय , आणि तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शितल वाघमारे हि एमपीएससी परीक्षेत यश मिळवून पीएसआय झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच उरण वाहतूक पोलीस शाखेचे पीएसआय संजय पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे व्हॉइस चेअरमन डी.आर. ठाकूर, गोपीनाथ ठाकूर, प्रभाकर मुंबईकर, गणेश पाटील , अविनाश पाटील, यशवंत घरत, रघुनाथ ठाकूर, सुभाष घरत,मधुकर म्हात्रे,मधुकर पाटील, हिराजी पाटील,तसेच विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस.एस. पर्यवेक्षिका म्हात्रे एस.सी .रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख व इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक आणि इयत्ता दहावीचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने