मोफेड्रीन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीकरिता आलेल्या एका नायजेरियन इसमास मुंब्रा पोलिसांकडून शिताफीने अटकमोफेड्रीन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीकरिता आलेल्या एका नायजेरियन इसमास मुंब्रा पोलिसांकडून शिताफीने अटक
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः तरुण पिढी अंमली पदार्थाच्या सेवनामुळे व्यसनाधिन व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढत चालली होती. याचा बिमोड करण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वपोनि निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मोफेड्रीन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीकरिता आलेल्या एका नायजेरियन इसमास पाठलाग करून शिताफीने अटक केली आहे. व त्याच्याकडून 1 लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


नायजेरियन आरोपी माउसे जस्टीन्स घानाईयन (43 रा.खारघर) हा मुंब्रा परिसरातील वाय जंक्शन या ठिकाणी एमडी या अंमली पदार्थ घेेवून येणार असल्याची माहिती वपोनि निवृत्ती कोल्हटकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय पवार, पो.उपनिरीक्षक नितीन भोसले, पो.अंमलदार धनंजय घोडके, उमेश राजपूत, प्रमोद जमदाडे, रविदास जाधव आदींच्या पथकाने सापळा रचून या आरोपीला मोटार सायकलसह ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एमडी हा अंमली पदार्थ आढळून आल्याने त्याला ताब्यात घेवून त्याने हा पदार्थ कोणाकडून आणला व कोणास विक्री करणार होता याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले व पथक करीत आहे.
 
थोडे नवीन जरा जुने