उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या खालापूर तालुक्यातील चौक विभागात असणाऱ्या व इर्शाळगडाच्या डोंगरावर वसलेल्या इर्शाळवाडी येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे, या दुर्घटनेत आतापर्यंत 29 ग्रामस्थ हे मृत्युमुखी पडले आहेत तर शेकडो ग्रामस्थ हे जखमी झाले आहेत. दिनाकं 22 जुलै 2023 रोजी इर्शाळवाडी दरडग्रस्त जखमींची या उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी एमजीएम पनवेल हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व अस्तेने विचारपूस केली तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शब्द दिला आहे.
सदर वेळी त्यांच्या सोबत पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, चौक जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उपसभापती श्यामभाई साळवी, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, उपतालुका संघटक के एम घरत, युवानेते सचिन एकनाथ मते व पदाधिकारी हेही त्यांच्यासोबत होते.
Tags
उरण