पनवेल दि.14/ प्रतिनिधी
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व जागृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवली, विभाग ,आंबे रा.जी. प शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे तथा जागृती फाऊंडेशन अध्यक्ष निलेश सोनावणे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता ढेबे, आदिवासी सम्राट चे संपादक गणपत वारगडा, तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे, उपाध्यक्ष संदेश पाटील, शिरवली विभाग अध्यक्ष प्रितेश भोईर, रायगड सम्राट चे संपादक शंकर वायदंडे, रायगड टाईम्स चे प्रतिनिधी राम बोरीले, उपस्थित होते.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती समिती आणि जागृती फाऊंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात, कला, क्रिडा सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून समितीच्या एकमताने वर्षभर राबविले जातात राबवितात.
पर्यावरण चा होत असलेला ऱ्हास ,सगळीकडे होत असलेली वृक्ष तोड यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सगळ्यानीच काम केले पायजे या संकल्पनेतून आजचा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रा. जी प शाळा आंबे येथील ग्रामस्थ आणि शाळा समितीने विविध समस्या आपल्या मनोगतात मांडल्या या समस्या निश्चितच सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे समिती आणि जागृती फाऊंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिति तथा जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे आदिवासी सम्राट चे संपादक गणपत वारगडा सामाजिक कार्यकर्ते रवी पाटिल जागृती फाउंडेशन चे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष नीरज सिंग , शिरवली विभाग उपाध्यक्ष रोहित उलवेकर , ग्राम पंचायत सदस्या गिरिजा संघवी ,पोलीस पाटील रेश्मा पाटील ,उपशिक्षिका सुरेखा भाविक ,अंगणवाडी शिक्षिका प्रमिला भोईर शालेय शिक्षण समिती अध्यक्षा सुषमा . दशरथ पाटील ,योगेश पाटील ,सुनील पाटील ,कल्पेश नाईक ,जगदीश भोईर , रोशन पाटील ,आकाश भोईर ,रविकांत भोईर ,दिलीप भोईर ,अक्षय कणेरे, हृतिक पाटील ,अभिजित पाटील ,आशीर्वाद खानावकर , गणेश संघवी ,अशोक उलवेकर ,अक्षय म्हात्रे ,गहिनाथ रंगवी ,प्रमोद भोईर ,भावेश रंगवी
Tags
पनवेल