ज्येष्ठ नागरिक व पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आले.






सालाबादप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर प्रभाग क्र. १९ चे विभाग अध्यक्ष संदीप पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अनिमेश ओझे, सचिन सिलकर व आकाश घाटे, आकाश दलाल यांचे तर्फे शालेय विद्यार्थी यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम प्रभागातील गावदेवी मंदिर येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक व पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आले. 



यावेळी विद्यार्थी सेना जिल्हा सचिव अक्षय जोशी, तालुका सचिव आकाश गाडे, महाराष्ट्रसैनिक मंदार पाटणकर, गणेश गायकर, केदार सोमण, रुपेश शेटे, विरेंद्र गुप्ता,केदार रेवाळे, अभि रिंगे, शुभम म्हात्रे, अक्षय जैतपाल तसेच प्रभागातील महाराष्ट्रसैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने