पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न





पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न 

पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज संपन्न झाली. या बैठकी दरम्यान पक्ष बांधणी, नवीन नियुक्ती, पक्ष संघटना वाढीसाठी सूचना इत्यादी विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांचा २२ जुलै रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच महायुती सरकारचे जनसामान्यांच्या हिताचे निर्णय जनतेत खोलवर रुजवण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सक्षमपणे करावे, या प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे साहेब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश नेरूळकर आणि पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण यांच्या पुढाकाराने Youtube Channel आणि Instagram Account चे उद्घाटन करण्यात आले. 



या Youtube Channel आणि Instagram Account च्या माध्यमातून पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध सामाजिक व राजकीय उपक्रम सर्वसमान्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत. याप्रसंगी बोलताना कार्यकारी अध्यक्ष डॉ. शिवदास कांबळे म्हणाले की, सोशल मीडियावर एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमांना अधिक प्रसिद्धी मिळेल.


यावेळी कार्यकारी अध्यक्ष डॉ. शिवदास कांबळे, प्रदेश संघटक सचिव राजकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष सुनील नाईक, पनवेल तालुका अध्यक्ष दर्शन ठाकूर, पनवेल तालुका महिला अध्यक्ष अक्षरा भोईर, परशुराम सुरते, खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके, जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलाणी, जिल्हा उपाध्यक्ष संजय ननावरे, जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, जिल्हा सचिव कुंडलिक नेटके, भाऊसाहेब लबडे, विलास खरटमोल, प्रभु फडके, रक्षा कांचन, अनुराग गायकवाड, रोशन आंग्रे, रचना कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने