भेंडखळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दिपक ठाकूर.
भेंडखळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दिपक ठाकूर.


मान्यवरांनी केला दिपक ठाकूर यांचा सत्कार.उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )भेंडखळ काँग्रेस कमिटीची मासिक सभा भेंडखळ काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत भेंडखळ ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच दिपक दामोदर ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार उरण तालुका काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते नरेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर, भेंडखळ गावचे काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते दिनानाथ ठाकुर, रमेश ठाकूर, रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष लंकेश ठाकुर उरण तालुका काँग्रेस कमिटी चिटणीस नाशिकात म्हात्रे, भेंडखळ गावातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला


.यावेळी अमोल ठाकूर,अमित पाटील,रोहण ठाकूर,जयेंद्र ठाकूर,नरेंद्र ठाकूर,प्रणय ठाकूर,पियुष ठाकूर,निलेश मोरखडकर,राजेश ठाकूर,राजु जाधव,समीर ठाकूर,सागर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.दिपक ठाकूर हे प्रामाणिक व्यक्तिमत्व असून त्यांनी गोरगरिबांना अनेक वेळा मदत केली. दिपक ठाकूर हे सज्जन व प्रामाणिक असे नेतृत्व आहे.राजकारणाचा व विविध समस्या सोडविण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.त्यामुळे ते भविष्यात सुद्धा प्रगतीपथावर राहतील.

असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.भेंडखळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दिपक ठाकूर यांची निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


थोडे नवीन जरा जुने