ट्रेलरची चोरी

ट्रेलरची चोरी
पनवेल दि.०१ (संजय कदम) : हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेला ट्रेलर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील जेएनपीटी रोडवर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 वेस्टर्न कॅरिअर इंडिया लि. कंपनीचा ७ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा सफेद रंगाची केबिन असलेला ट्रेलर


(एनएन ०१ के ०७६८) हा चालकाने पनवेल-जेएनपीटी रोडवरिल शर्मा हटिलचे पार्कींगमध्ये पार्क केले होते. मात्र अज्ञात चोरट्याने तो चोरून नेला. त्याच्यासोबत १ लाख पिवळया रंगाची ट्रीपल एक्सल ट्रॉली असा एकूण ८ लाख रुपयाचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने