स्टार्टअपवर केंद्रित शाखांमध्ये नवी मुंबईचा समावेश





स्टार्टअपवर केंद्रित शाखांमध्ये नवी मुंबईचा समावेश 


पनवेल (प्रतिनिधी) सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख असलेल्या बँक ऑफ इंडिया बँकेने स्टार्ट- अपवर केंद्रित शाखांच्या माध्यमातून तीन खास स्टार्ट- अप्स केंद्र लाँच केली आहेत. त्यामध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. 



            बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरजनीश कर्नाटक यांनी आज स्टार्ट- अपवर केंद्रित दोन शाखांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले, तर तुर्भे, नवी मुंबईतील स्टार्ट- अप शाखेचेउद्घाटन करण्यासाठी ते उपस्थित होते. या स्टार्टअप शाखा भारतात स्टार्ट-अप संस्कृतीला चालना देण्यासाठी, नाविन्य व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत आहेत. स्टार्ट- अप इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम असून त्याद्वारे शाश्वत आर्थिक विकास करण्याचे आणि स्टार्ट – अप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय आहे. भारत स्टार्ट- अप केंद्र म्हणून उदयास येत असून आतापर्यंत ९३ हजार स्टार्ट- अप्सची डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडकडे (डीपीआयटी) नोंदणी झाली आहे. या शाखा स्टार्ट- अप्सना आवश्यक त्या सर्वसेवा एकाच छताखाली पुरवतील आणि स्टार्ट- अप यंत्रणेतील उद्योजकांसाठी एखाद्या केंद्राप्रमाणे आर्थिक व इतर सुविधा देतील. या शाखांमध्ये स्वतंत्र स्टार्ट- अप डेस्क आणि रिलेशनशीप मॅनेजरचीही व्यवस्था असणार आहे. 



        याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरजनीश कर्नाटक म्हणाले, ‘बँक ऑफ इंडियाने आज मुंबई, बेंगळुरू आणि दिल्लीपासून सुरुवात करत सात स्टार्ट- अप शाखांना तत्वतः मंजुरी दिली आहे. या स्टार्ट- अप शाखा बँक ऑफ इंडियाच्या एमएसएमईबुकमध्ये समाविष्ट होतील. स्टार्ट- अपवर केंद्रित बेंगळुरूमध्ये बंगळुरू मुख्य शाखा, नवी दिल्लीमध्ये संसद रस्ता शाखा, नवी मुंबई येथे तुर्भे या तीन शाखा असून बँक ऑफ इंडियाने आणखी ९ ठिकाणी स्टार्ट- अप केंद्रित शाखा सुरू करण्याचे ठरवले आहे. ही केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील. गेल्या कित्येक दशकांपासून हि बँक समाजातील सर्व घटकांची पसंतीची बँक असून देशभरात नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देण्यात आम्ही मुख्य भूमिका निभावली आहे.





थोडे नवीन जरा जुने