पनवेल दि.२७ (संजय कदम) : महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हाप्रमुख शिरीष यांच्या आदेशानुसार शहरप्रमुख यतिन देशमुख आणि शहर संघटिका अपूर्वा प्रभू यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नविन पनवेल शहर शाखेतर्फे कमल अर्णव चॅरिटेबल ट्रस्ट मधील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ इत्यादिंचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवीण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिक दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मातोश्री निवासस्थानी शिवसैनिक जमा होतात मात्र यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी कोणते तरी सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना नविन पनवेल शहर शाखेतर्फे कमल अर्णव चॅरिटेबल ट्रस्ट मधील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ इत्यादिंचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवीण्यात आला.
यावेळी मुलांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपमहानगर प्रमुख किरण तावदारे , शहर समन्वयक शिवाजी पालांडे , विभाग प्रमुख किरण सोनावणे , बिपीन झुरे , राजेश वैगणकर , संजय भोसले,विभाग संघटक संतोष वाघमारे, शाखाप्रमुख वसंत सोनावणे, जयेश पाटील, गोविंद जोग, विकास पोवळे, प्रवीण चोणकर, ज्ञानेश्वर सावंत, काशिराम थळी, सुगंधा शिंदे ,मालती पिंगळा, वैशाली थळी, तनुजा झुरे, सेजल खडकबाण, अलका सानप, अर्चना पाटील, मनीषा भुर्के यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी, युवती सेना हजर होते.
Tags
पनवेल