पनवेल दि. १४ ( संजय कदम ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी झोपडपट्टीवासियांच्या नागरी समस्या महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून सोडवणार अशी ग्वाही रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी एकविरा झोपडपट्टी ओ. एन. जी. सी. काळुंद्रे यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त सत्कारा प्रसंगी उत्तर देतांना दिली.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या एकविरा झोपडपट्टी ओ. एन. जी. सी. काळुंद्रे यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी झोपडपट्टीतील सर्व महिला वर्ग उपस्थित होते . आपल्या सत्कार पर भाषणामध्ये महेश साळुंखे यांनी सांगितले की, ज्या काही समस्या या झोपडपट्टीला असतील ज्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल , रस्त्याच्या प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांसाठी महानगरपालिकेशी संपर्क साधून आपल्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील.
Tags
पनवेल