शाळेत रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊन व इंडियन अकॅडमी ऑफ पीडिया ट्रिक्सच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीरशाळेत रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊन व इंडियन अकॅडमी ऑफ पीडिया ट्रिक्सच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर
पनवेल दि.२६(संजय कदम): रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊन (RCKM) व इंडियन अकॅडमी ऑफ पीडिया ट्रिक्स चा राष्ट्रीय उपक्रम आहे. त्यानुसार सामान्य आरोग्य तपासणी शिबिरा बरोबर एक सत्र आयोजित केले होते. ज्यात जिल्हा परिषद मुरबी. खारघर शाळेत लहान मुलांच्या जंक फूडच्या सवयी, झोपेची पद्धत, स्क्रीन वेळ, पदार्थांचे सेवन प्रतिबंध, अंमली पदार्थांचे व्यसन आणि पर्यावरणीय प्रदूषण या विषया वर तज्ञांनी विद्यार्थ्यांशी व काही पालकांशी माहितीपर चर्चा करण्यात आली.      शाळेत जाणारी मुले शारीरिक आणि मानसिक वाढीच्या कोवळ्या वयात असतात आणि हे असे वय आहे जिथे मुलांचे उत्तम स्तरावर पालनपोषण केले गेले तर त्यांचे रूपांतर निरोगी रोगमुक्त प्रौढांमध्ये होते. म्हणूनच, या मूलभूत गोष्टींमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने, 'रोटरी खारघर मिडटाऊन टीम' मधील 6 डॉक्टर, स्वयंसेवक आणि SSS च्या काही डॉक्टरांनी, मुरबी गाव, खारघर येथील जिल्हा शाळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून 156 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनचे मानद सदस्य डॉ. चित्रा कुलकर्णी, डॉ. कोमल गुंडेवार, समीर कर्वकर, अ‍ॅन. प्रियांका करवकर, अध्यक्ष अनुप गुप्ता, फर्स्ट लेडी मोना गुप्ता, सेवा प्रकल्प संचालक आणि पीई शैलेश पटेल, सचिव डॉ. रविकिरण कुमार यांच्यासह इतर रोटरीयन, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने