आज शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख सन्मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल ग्रामीण देवद येथील शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी सर्वांचे स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, संदीप तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, विभाग प्रमुख बिपिन झुरे, विशाल भोईर, धनराज बडे, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, धनजंय पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटीका सौ. सुजाता कदम, उपजिल्हा संघटीका सौ. तनुजा झुरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
पनवेल