भंडारी बँकेचे अस्तित्व धोक्यात






भंडारी बँकेचे अस्तित्व धोक्यात
निवडणुकीत दंडेलशाही,अराजकी!
लोकशाहीचा खून ! साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून ती चाळीस वर्षे प्रमाणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खड्यासारखे बाजूला केले गेले



सर्व पत्रकार बंधू / भगिनीना आमची विनंती आहे की आमच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवावा            

  दादर येथीलवामन हरी पेठे समोरील  भंडारी मंडळ, पश्चिम च्या येऊ घातलेल्या  दादर भंडारी मंडळाच्या  समाजाच्या निवूडणुकीत आम्ही सर्व अटी पूर्ण करून उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी अर्ज भरले आणि ते देण्यासाठी गेलो असता आमचे अर्ज स्वीकारले नाहीत असे का ? याला भंडारी मंडळाच्या काही पदाधिकारी यांनी जाणीवपूर्वक आमचे अर्ज घेऊ नयेत म्हणून केलेलं हे कट कारस्थान आहे असा आवाज उठवल्यावर अर्ज  घेतले गेले     



मात्र १६ जणाचे अर्ज बेकायदेशीर रित्या अपात्र करून निवडणूक बिनविरोध जिकल्याचे जाहीर केले!
जे पुर्णत: अन्यायकारक आहे! 
आमची विनंती आपल्यामार्फत आमचा आवाज सर्वत्र पोहोचवावा आणि न्याय्य कृतीसाठी सहकार्य करावे! 



  लोकशाहीचा खून ! साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून ती चाळीस वर्षे प्रमाणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खड्यासारखे बाजूला केले गेले आता माघार नाही असे म्हणत आज पासून कायदेशीर लढाई या  सुरू केलेली आहे 
भंडारी बँक ही तर 117 वर्षाची मातृसंस्था! भंडारी मंमंडळाच्या समाज धुरीणानी  रक्ताचे पाणी करून ही संस्था उभी केली.  आज आम्ही सत्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर उद्याची पिढी कुणाला माफ करणार नाही !


सत्य जाणून घ्या आणि सहकार्यासाठी उभे रहा असे आवाहन
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघचे अध्यक्ष - श्री नविनचंद्र बांदिवडेकर  व श्री जगदीश अडवीरेकर  +91 96190 85488 यांनी केले आहे...




थोडे नवीन जरा जुने