शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल उपशहर संघटिका मालती पिंगळा यांचा वदवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल उपशहर संघटिका मालती पिंगळा यांचा वदवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा
पनवेल दि.०३(संजय कदम):  शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  उपशहर संघटिका मालती पिंगळा यांनी त्यांचा वाढदिवस चिंचवली येथील आश्रम शाळेतील मुलांना खाऊचे आणि गरजू  साहित्यांचे वाटप करून साजरा केला. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू आले.       शिवसेनेचा उपशहर संघटिका मालती पिंगळा यांनी वाढदिवसा निमित्त चिंचवली येथील वनवासी कल्याण या अनाथ मूलांच्या आश्रम शाळेत मुलांना गरजू साहित्य तसेच खाऊचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवला.  यावेळी शहर प्रमुख यतिन देशमुख, उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, शहर संघटिका अपूर्वा प्रभू, शहर समन्वयक शिवाजी पालांडे, विभाग प्रमुख किरण सोनावणे, राजेश वैगणकर, विभाग संघटक संतोष वाघमारे, शाखाप्रमुख वसंत सोनावणे,  गोविंद जोग, नरदास म्हात्रे , काशिराम थळी, वैशाली थळी , अलका सानप, अर्चना पाटील, मनीषा भुर्के उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने