राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्रचा दबदबा.




राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्रचा दबदबा.


उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )दिनांक २३ ते २७ऑगस्ट २०२३ रोजी हरिवंश ताना भगत स्टेडियम राची झारखंड येथे वाको इंडिया कॅडेट आणि जुनियर नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये एकूण २८ राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान प्राप्त केले. उपस्थित मान्यवर झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांच्या हस्ते महाराष्ट्र टीमला प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी देण्यात आली.



महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष- निलेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगडचे अध्यक्ष- सुधाकर घारे,जीवन ढाकवळ, आणि दीपेश सोलंकी तसेच पेण तालुक्यातील युथ कराटे अकॅडमीचे अध्यक्ष आणि कोच- संतोष मोकल, पनवेल अकॅडमीचे कोच शैलेश ठाकूर, उरण अकॅडमीचे कोच विजय भोईर,कुमार,यश जोशी नॅशनल कोच यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या नॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये रायगडच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.



सुयश प्राप्त केलेले रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी खालीलप्रमाणे :- 
१) कुमारी .दक्षता मंगेश जोशी.
     गोल्ड आणि सिल्वर मेडल.
२) कुमारी. क्षितिजा गिरजात्मक साळवी
     गोल्ड आणि ब्राॅन्झ मेडल .
३) कुमारी- उमंग गणेश तांडेल.
     सिल्वर आणि ब्राॅन्झ मेडल
४) कुमारी- सौम्या हर्षल पिंपले.
     सिल्वर आणि ब्राॅन्झ मेडल
५) कुमारी- भक्ती विजय भोईर
     सिल्व्हर मेडल
६) कुमारी- सोनिया शैलेश खोब्रागडे
     सिल्व्हर मेडल
७) कुमारी- दिव्या दशरथ पाटील
     सिल्व्हर मेडल
८) कुमार- पियुष नाना धायगुडे  
     सिल्व्हर मेडल
९) कुमार- हर्ष उदय जोशी.
      ब्राॅन्झ मेडल
१०) कुमार- मनीष नरेंद्र म्हात्रे.
     ब्राॅन्झ मेडल
११) कुमारी- हंसिका संतोष मोकल.
     ब्राॅन्झ मेडल
१२) कुमारी -अरोही रोशन चव्हाण.
      सहभाग


थोडे नवीन जरा जुने