पनवेल दि.०१ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख संदिप तांडेल यांच्या वतीने शिवसेना शाखा विचुंबे आणि देवद येथे छत्री वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल, पनवेल तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे,कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, विभागप्रमुख विचुंबे विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, सुकापूर शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे सचिन खरात विभाग प्रमुख धनंजय पाटील, उपविभाग प्रमुख सुमित सुळे उपविभाग प्रमुख नितीन पाटील, उपशहर प्रमुख नविन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी शिवसैनिक हरिचंद्र कदम शाखा संघटीका नम्रता शिंदे यावेळी उपस्थित होत्या.
Tags
पनवेल