डॉ.दत्ता हिंगमिरे उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित.






डॉ.दत्ता हिंगमिरे उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने सन्मानित.

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.डॉ. दत्ता हिंगमिरे हे गेली आठ वर्ष एन एस एस कार्यक्रम अधिकारी म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहेत.




 पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, निवडणूक जनजागृती कार्यक्रम, एड्स जनजागृती, स्वच्छता अभियान, आदिवासींसोबत दिवाळी, ग्रंथालय स्थापना व वाचन चळवळ, विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण विकास इत्यादी पातळीवर भरीव कार्य केले असून विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.संस्थेची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपुरे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड, ज्येष्ठ प्रा. के.ए. शामा, प्रा. व्हि. एस. इंदुलकर, आय. क्यू. ए.सी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, ऑफिस सुप्रिटेंडन तानाजी घ्यार, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सर्व सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
.


थोडे नवीन जरा जुने