माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादपनवेल (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंंडेशनच्या वतीने पनवेल प्रभाग क्रमांक १९ करिता माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रविवारी आयोजित करण्यात आली होती. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी ७० मुलांनी सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.


चला आपला बाप्पा स्वतः साकारूया, पर्यावरणाचा समतोल राखूया या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी श्री गणपती मंदिर येथे माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रंगली. या वेळी आर्टिस्ट नूतन पाटील व त्यांच्या टीममधील अभिषेक सुनका, निखिल सुनका, रितू यांनी लहान मुलांना गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.


गेली दोन वर्षे कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. लहान मुलांना इकोफ्रेंडली गणपतीचे महत्त्व कळावे तसेच पर्यावरर्णाचे भान असावे या उद्दिष्टाने कोशिश फाउंडेशनच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, सोसायटी मित्र मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, उपाध्यक्ष संदीप पाटील, अमरीश मोकल, भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, पवन सोनी आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने