दोन लाखांहून अधिक अन्य परितोषकांसह धमाल मस्तीची रेलचेल
मा आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्ष कामोठे यांच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कामोठ्यातील स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील क्रीडांगण, सेक्टर 20 येथे हा दहीहंडी सोहळा रंगणार आहे. मानाची दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
साहसी खेळाच्या अनुषंगाने मानवी थर रचत दहीहंडी फोडण्याचा प्रकार दिवसेंदिवस व्यावसायिक स्वरूप धारण करत आहे. शेकडो पथके गोविंदा मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिने सराव करत असतात.
अशा पथकांच्या उत्साहवर्धनासाठी ठिकठिकाणी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन होत असते. कामोठे विभाग शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लाख मोलाची हंडी अशी थीम घेत भव्य दिव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाच थर, सहा थर आणि सात थर लावणाऱ्या प्रत्येक दहीहंडी पथकास पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या स्त्री व पुरुषांना आकर्षक लकी ड्रॉ द्वारे विविध पारितोषिके दिली जाणार आहेत.
सुप्रसिद्ध उद्योगपती तथा शेकाप नेते जे एम म्हात्रे, पनवेल शहर चिटणीस गणेश चंद्रकांत कडू, शेकाप नेते काशिनाथ पाटील, माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांची या दहीहंडी सोहळ्या दरम्यान व्यासपीठावर विशेष उपस्थिती असणार आहे.
अल्पेश माने,कुणाल भेंडे,गौरव पौरवाल यांच्या पुढाकाराने आयोजनाची सारी कामे नेटाने पूर्ण केली जात आहेत. गोविंदा पथकांच्या थरारा सोबतच मराठी हिंदी गाणी आणि लावणी नृत्याचा देखील उपस्थित प्रेक्षकांना लाभ मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात अथवा अधिक माहितीसाठी ९८२१९०१७५८ या क्रमांकावर संपर्क करावा.
Tags
पनवेल