कंटेनरची मोटार सायकलीस धडक; एकाच मृत्यू
कंटेनरची मोटार सायकलीस धडक; एकाच मृत्यू
पनवेल दि.०४(संजय कदम): भरधाव वेगाने कंटेनर चालवून अचानक वळविल्याने कंटेनरच्या पाठीमागून आलेल्या मोटारसायकलीस त्याची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील मुंबई - पुणे जुने हायवेवरील शिवनेरी हॉटेल समोर घडली आहे. 


 कंटेनर क्रमांक एम एच ४६ बी एम ७७८७ हा घेऊन चालक मुक्तार हमीद अली हा त्याच्या ताब्यातील कंटेनर घेऊन पनवेल जवळील मुंबई - पुणे जुने हायवेवरील शिवनेरी हॉटेल समोरून जात असताना अचानक कंटेनर वळविल्याने कंटेनरच्या पाठीमागून आलेल्या मोटारसायकलीस त्याची धडक बसून या अपघातात चालक कल्पेश जनार्दन कातकरी (वय २३) हा गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने