शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्या बाबत सखोल चौकशी व्हावी- युवासेना महाराष्ट्र सचिव रूपेश पाटील








शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्या बाबत सखोल चौकशी व्हावी- युवासेना महाराष्ट्र सचिव रूपेश पाटील
पनवेल दि. ०३. ( वार्ताहर ) : उरण येथील शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्या बाबत सखोल चौकशी व्हावी आणि आरोपी सतीश गावंड - सुप्रिया पाटील यांनी फसवून लुटलेल्या गरीब जनतेला त्यांचे पैसे मिळावे व न्याय मिळावा ह्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय पदाधिकारी महाराष्ट्र सचिव रूपेश पाटील यांनी आवाज उठविला आहे


 . 
                           गेले ७-८ महिने हे प्रकरण गाजत आहे, आरोपीना अटक झाली मात्र हजारो लोकांनी त्यावेळी सतीश गावंड ला वाचविण्यासाठी पोलीसस्टेशन आणि कोर्टाबाहेर आंदोलने केली का तर ह्या देवमाणूस आपल्याला सुटल्यावर पैसे परत देईल मात्र जामिनावर सुटून ही आणि ७-८ महिने वाट पाहूनही ह्या आरोपीनी कोणालाही पैसे परत दिले नाहीत. ह्यात अनेक एजंट काम करत होते, करोडो रुपये गोळा करुन ह्या प्रक्रियेत टाकत होते मात्र सुटून आल्यावर ही कोणाचे पैसे मिळत नव्हते, नो कोणी ह्याबाबत बोलत होतं ना कोणी आवाज उठवत होते मात्र युवासेनेचे रूपेश पाटील यांनी ह्यावर आंदोलन सुरू केले,



 लोकाना आवाहन केले आणि आपली फसवणूक झालीय हे सरकारी दरबारी सांगू या, पोलीस प्रशासनाला मदत करुन ह्या आरोपीना समाजासमोर आणूया ह्यासाठी एका जन संघर्ष समितीची स्थापना केली जिथे हे प्रकरण झाले त्याच गावात पहिली सभा लावली आणि हजारो लोकांनी जमा होऊन प्रतिसाद दिला, त्याच धर्तीवर चिरनेर, येथेही मोठी सभा घेण्यात आली, ह्या फसवणुकीबाबत कोणत्या प्रकारे अर्ज भरावे कोणत्या प्रकारे माहिती द्यावी ह्याबाबत प्रबोधन सुरु केले. आज हजारो लोकांनी फॉर्म भरले असून आपले पैसे मागण्यासाठी २ पाऊले पुढे आले आहेत. सदर प्रकार ह्याबाबत मदत मिळावी पैसे परत मिळावे म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्ग ह्या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांची मदत घेतली जाणार आहे सभेची माहिती त्यांना देण्यात येते आणि एक स्पेशल इन्व्हेस्टिंग टीम ने ह्या घोटाळ्याचा अभ्यास करावा तपास करावा ही मागणी ह्या कमिटी च्या वतीने करण्यात येणार आहे.


थोडे नवीन जरा जुने