कर्नाळा अभयारण्यात महामार्गावर जेएसडब्लू कंपनीची बस झाली पलटी
कर्नाळा अभयारण्यात महामार्गावर जेएसडब्लू कंपनीची बस झाली पलटी
पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्याच्या गेट समोर आज दुपारच्या सुमारास जेएसडब्लू कंपनीची बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोण्हीती जीवित हानी नाही झाली.     कर्नाळा अभयारण्यामध्ये आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पेणकडून पनवेलच्या दिशेने जात असलेली जे एस डब्ल्यू कंपनीची बस क्रमांकएम एस ४६ बी यू २२३९ वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन बस पलटी झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून या अपघातामुळे पेणकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पनवेल पेण मार्गावर वळविण्यात आली आहे. आज सकाळपासून पडत असलेल्या पावसाळामुळे बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. 


थोडे नवीन जरा जुने