भाजप जिल्हा सरचिटणीस तथा मा.नगसेवक नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिरीब संपन्न

भाजप जिल्हा सरचिटणीस तथा मा.नगसेवक नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिरीब संपन्न
पनवेल दि.२९(वार्ताहर): भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस, जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील यांचा वाढदिवस आज पनवेल तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम रावबत साजरा करण्यात आला. याअंतर्गत वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्था, माता बालसंगोपन मंडळाचे सूति कारागृह व स्वाती ऑप्टिक्स पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने "मोफत आरोग्य शिबिर" आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते उदघाटन झाले. तसेच या शिबिराला पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिबिराला भेट देत चष्म्याचे वाटप करत नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मा.नगसेवक नितीन जयराम पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे "मोफत आरोग्य शिबीर" आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्त तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, ईसीजी, प्राथमिक तपासणी, स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा मुकीत काझी, पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, मा.जि. प सदस्य अमित जाधव, सरचिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेविका नीता माळी, आनंद देवाळे, किशोर सुर्वे, संजय जैन, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रसाद हनुमंते यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने