कळंबुसरे मध्ये आयुष्यमान भारत योजना शिबिराला उत्तम प्रतिसादकळंबुसरे मध्ये आयुष्यमान भारत योजना शिबिराला उत्तम प्रतिसाद

उरण दि. 11 (विठ्ठल ममताबादे ) गोरगरिब जनतेला खाजगी हॉस्पीटलमध्य सेवा, उपचाराचे दर परवडत नाही. नाईलाजाने पैसे अभावी अनेक रुग्णांना चांगली सुविधा, सेवा मिळत नाही. तर चांगली सेवा सुविधा मिळाली नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वेळेत उपचार न मिळाल्यानेही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात ही जनतेची आरोग्याची समस्या लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे पूर्व विभाग सरचिटणीस रुपेश पाटील यांनी उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर राबविले. या शिबीराला जनतेचा,नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून एकूण 150 नागरिकांनी शिबीराचा प्रत्यक्ष लाभ घेतला. या शिबीराच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या आयुष्यमान भारत योजना विषयी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुलदिप नाईक, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल केणी, भाजप बूथ अध्यक्ष सुदर्शन जाधव,गाव अध्यक्ष राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सविता नाईक, मनोहर नाईक, प्रसाद पाटील , विल्सन भोईर, अनंत खारपाटील आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे उरण पूर्व विभाग सरचिटणीस रूपेश पाटील यांनी आयोजित केलेल्या आयुष्यमान भारत आरोग्य शिबीरात उत्तम नियोजन असल्याने व ग्रामीण भागात ही सेवा उपलब्ध केल्याने जनतेने, नागरिकांनी रूपेश पाटील यांचे आभार मानले आहेत.


थोडे नवीन जरा जुने