पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे पनवेल आयोजित रक्तदान व महाआरोग्य शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद.


पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे पनवेल आयोजित रक्तदान व महाआरोग्य शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद.


उरण दि 2 (विठ्ठल ममताबादे ) नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे तसेच नागरिकांमध्ये आरोग्या विषयी जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे पनवेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ग्रामपंचायत करंजाडे, जिल्हा परिषद शाळा येथे भव्यदिव्य असे रक्तदान शिबीर आणि महाभारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले.यावेळी एकूण 75 रक्त दात्यांनी रक्तदान केले तर एकूण 200 नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
करंजाडे ग्रामपंचायत (जिल्हा परिषद शाळेचा हॉल) करंजाडे पनवेल जि. रायगड येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात रुग्णांची मोफत नेत्रतपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, हृदयाची इसीजी तपासणी हाडांची घनता, सीबीसी तपासणी करण्यात आली.विविध रुग्णांना डॉक्टरांनी मोफत सल्ला दिला. यावेळी रुग्णांनी या मोफत तपासणीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठान करंजाडे,सनराईज हॉस्पीटल करंजाडे,सिमीरा डायग्नोस्टिक सेंटर करंजाडे,तेरणा मल्टीस्पेशालिटी आणि रिसर्च सेंटर नेरूळ, साई ब्लड बँक पनवेल आदिचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे,म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष विनोद साबळे , डॉ. विक्रम पाटील, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे,पोलीस उपनिरीक्षक संजय धारेराव आदी मान्यवर उपस्थित होते
.डॉ. विक्रम पाटील,ज्वालासिंह देशमुख,रामचंद्र महाडिक,शुभम धारेराव,अमित कांबिरे,सचिन गोरड,सचिन कदम,नितीन कुंभार, संदीप चव्हाण,यशवंत घाडगे,अजित कदम,दादासाहेब मोरे,किरण कंक, शिवाजी सुंबळे, योगेश गोरे,महादेव पाटील,नंदकुमार महाजन आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.सूत्रसंचालन रामचंद्र महाडिक आणि आभार प्रदर्शन डॉ. विक्रम पाटील यांनी केले.विशेष म्हणजे पहिल्यांदाच राबविलेल्या रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.


थोडे नवीन जरा जुने