उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )
आत्माराम ठाकूर मिशन संचलित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंर्तगत जिल्हा क्रिडा परिषद रायगड द्वारा आयोजित तालुकास्तरीय शाळेय क्रिडा स्पर्धा व जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा पार पाडण्यात आल्या त्यामध्ये विदयालयाची अक्षा उत्तम गावंड ही विदयार्थीनी १४ वर्षाखालील मुंबई विभागात ज्युदो या स्पर्धेत प्रथम आली व राज्य स्तरावर प्रथम क्रमांक येवून निवड झाली आहे. तसेच विभागीय स्तरावर तनिष्का गावंड, वेदांत गावंड व नियती ठाकूर यांना कास्य पदक मिळाले आहे.
तालुका स्तरावर १४ वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ व १४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघाला अनुक्रमे द्वितीय क्रमांक मिळाला. तालुका स्तरीय थाळी फेक स्पर्धेत श्रीची वर्तक द्वितीय क्रमांक व रिले स्पर्धेत सार्थकी पाटील, सानिया गावंड, गौरी गावंड, रितीका गावंड व सृष्टी म्हात्रे यांना द्वितीय क्रमांक मिळाला. १००मी. धावण्यात मोहीत म्हात्रे व यश गावंड यांचा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. तसेच लांब उडीमध्ये मोहीत म्हात्रे तृतीय क्रमांक तसेच थाळी फेक मध्ये अर्थव गावंड याचा द्वितीय क्रमांक तसेच भाला फेक मध्ये प्रभात ठाकूर याचा तृतीय क्रमांक मिळाला.
रायगड विभागात सन २०२३ - २४ या वर्षी ज्युदो या स्पर्धेत जास्त पदके मिळवणारी शाळा म्हणून घोषित करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा क्रिडा संकूल, सांगली येथे राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धा होणार आहेत यामध्ये अक्षा गावंड ही विदयार्थीनी भाग घेणार आहे. या सर्वांना क्रिडा शिक्षक शुभम ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. विदयालयाच्या मुख्याध्यापिका निकीता म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, खजिनदार वामन ठाकूर, सचिव अलका ठाकूर, विश्वस्त सिंधू ठाकूर व प्रसाद ठाकूर, शिक्षक पालक संघाच्या उपाध्याक्षा शुभांगी पाटील व सदस्य यां
नी सर्वांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल पंचक्रोशीतील क्रिडा प्रेमी यांनी विदयार्थ्यांचे कौतुक केले.
Tags
उरण