१ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पसार झालेले दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलीसांनी केले गजाआडपनवेल दि.२९(संजय कदम): पनवेल जवळील शिरढोण गावाच्या हद्दीत एका विवाहित महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पसार झालेले दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलीसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे इतरही चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.    या घटने नंतर सदर महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नितीन लभडे, पोउपनि हर्षद जुईकर, पोहवा वायकर, पोहवा कुडावकर, पोहवा झाजम, पोना भोसले व पोना पारधी आदींच्या पथकाने तांत्रिक व गुप्तबातमीदाराच्या आधारे तपास सुरु केला असता ते दोन गुन्हेगार नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून आरोपी लहू बबन उर्फ बबलू काळे (वय २२) आणि विनोद गोविंद पिंपळे (वय ३८) यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने