वर्षभरापासून खून करून पसार असलेल्या आरोपीस खांदेश्वर पोलिसांनी नेपाळ येथून केली अटक







वर्षभरापासून खून करून पसार असलेल्या आरोपीस खांदेश्वर पोलिसांनी नेपाळ येथून केली अटक
पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : हत्या करून गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या व नेपाळ देशात अस्तित्व लपवून बसलेल्या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी फरीदाबाद येथून अटक केली आहे.
      सुकापूर येथे वेल्डिंग व्यवसाय करणाऱ्या रियाजुद्दीन शेख (वय 58) यांची कुंदन कुमार ब्रिज किशोर गिरी राहणार बिहार यांनी हत्या करून तो नेपाळमध्ये पसार झाला होता. त्याचा शोध घेऊन देखील तो एक वर्षापासून मिळून येत 



. व्हता या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी पोलीस उपयुक्त परिमंडळ २चे पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वपोनि चंद्रकांत लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे गलांडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि समीर चासकर, शरद बरकडे, पोलीस हवालदार महेश कांबळे, अमित पाटील, धीरेंद्र पाटील, भाऊराव भास्कर, सचिन सरगर, सचिन पवार, स्वप्निल कोळी आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा फरीदाबाद राज्य हरियाणा येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानंतर खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पथक फरीदाबाद राज्य हरियाणा येथे जाऊन गुन्ह्यातील आरोपी कुंदन कुमार ब्रिज किशोर गिरी याला ताब्यात घेतले व त्याला अटक केली आहे न्यायालयाच्या आदेशान्वये आरोपीला 6 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे 


थोडे नवीन जरा जुने