जय माता दि ग्रुप महिला मंडळाच्या माध्यमातून गो शाळेसह गरजूंना मदतीचा हात





जय माता दि ग्रुप महिला मंडळाच्या माध्यमातून गो शाळेसह गरजूंना मदतीचा हात
पनवेल दि.०३(संजय कदम): पनवेल शहरातील जय माता दि ग्रुप महिला मंडळाच्या माध्यमातून गेल्या ८ वर्षांपासून २५ ते ३० महिला एकत्रित येऊन विविध ठिकाणी भजनाचे कार्यक्रम सादर करतात व तेथे मिळणारे मानधन हे स्वतःकडे न ठेवता ते गो शाळेसह गरजूंना आवश्यक असलेल्या मदतीसाठी खर्च करत असल्याने या महिला मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 




 मधू परमार, मंजू कलोर, यशोदा कुमावत, निमा वैष्णव व निशा वैष्णव या प्रमुख भगिनींसह इतर २५ ते ३० महिला एकत्रित येऊन आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत मिळणाऱ्या वेळामध्ये त्या विविध सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रमानिमित्त विविध मंदिर, नवरात्र उत्सव किंवा घरी जाऊन त्याचप्रमाणे श्रावणात भजने सादर करतात. व त्यांना मिळणारे मानधन हे जमा करून ते पैसे गोर गरीब व गरजूंना त्याचप्रमाणे गो शाळेला मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपतात यंदाच्या वर्षी त्यांनी सलग ९ दिवस नवरात्री हिंदू सार्वजनिक मंडळ येथे भजनाचे कार्यक्रम सादर केले. त्याचप्रमाने शहरातील गावदेवी मंदिर, दुर्गामाता मंदिर, करंजाड्यातील शिव मंदिर आदी ठिकाणी त्याच्या भजनाचे कार्यक्रम नियमित सादर होत असतात. त्याच्या या उपक्रमाचे समाजासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


थोडे नवीन जरा जुने