धनत्रयोच्या दिवशी बरसलेल्या पावसामुळे फटाका विक्रेते तसेच इतर विक्रेत्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळी सणा मुळे पनवेल परिसरातील बाजार पेठ सजली आहे. नागरिक देखील खरेदी करता बाजार पेठेत गर्दी करत आहेत.
शुक्रवारी (ता. 10) देखील बाजारात खरेदीची लगबग सुरू असतानाच खरेदी करता बाजारात आलेल्या नागरिकांचा पावसाने हिरमोड केला. पावसामुळे घरी जाणाऱ्यांसह खरेदीला आलेल्या नागरीकांना आडोशाला साहित्यासह उभा राहून पाऊस जाण्याची वाट पहावी लागली.