टेलिग्रामच्या माध्यमातून इसमाला करण्यात आली जबरी मारहाण







टेलिग्रामच्या माध्यमातून इसमाला करण्यात आली जबरी मारहाण
पनवेल दि.०२(वार्ताहर): टेलिग्रामच्या माध्यमातून ६ महिन्यापूर्वी ओळख झालेल्या एक इसमाला त्याच्या घरात जबरीने प्रवेश करून दोघा जणांनी हाता बुक्क्याने व चाकूने वार करून त्याच्या खिशातील ३ हजार रुपये चोरून नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील इंडिया बुल्स ग्रीन सोसायटी येथे घडली आहे. 


 तालुक्यातील कोण गाव येथील इंडिया बुल्स ग्रीन सोसायटीमध्ये राहणारे भरत अग्रवाल यांची सहा महिन्यापूर्वी कविता भट हिच्या बरोबर टेलिग्रामच्या माध्यमातून ओळख झाली त्यानंतर ते एकमेकांशी मेसेज व व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधत होते. यावेळी भरत अग्रवाल यांनी सदर महिलेला घरी बोलवले असता तिने तिच्या बरोबर आणलेल्या नितीन सिंग याच्यासह त्याच्या घरात जबरीने प्रवेश करून दोघा जणांनी त्याला हाता बुक्क्याने व चाकूने वार करून त्याच्या खिशातील ३ हजार रुपये चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तलौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने