रिक्षा व टॅक्सी चालकाची मिटिंग घेऊन पोलिसांचे मार्गदर्शन
मुंबई पाठोपाठ नवी मुंबई सुद्धा वेगाने उभारी घेत आहे. अश्यातच नवी मुंबईत विविध आयटी कंपन्या, एमआयडीसी, कॉर्पोरेट ऑफिस, एपीएमसी मार्केट यांसह विविध कारणास्तव नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. 

यासाठी सुसज्ज व शिस्तीचे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख वाढावी यासाठी वाशी वाहतूक पोलिसांनी वाशी प्लाझा येथे रिक्षा चालक व टॅक्सी चालक यांची मिटींग घेऊन त्यांना आपला गणवेश परिधान करणे याबाबत वाशी वाहतूक पोलिसांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात रिक्षा तसेच टॅक्सी चालक उपास्थित होते.थोडे नवीन जरा जुने