मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष - २ पनवेल च्या पथकाने केले गजाआड जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत



पनवेल दि.१२डिसेंबर (4K News)  : पनवेल शहरासह कामोठे पोलीस ठाणे , नेरुळ पोलीस ठाणे, सीबीडी पोलीस ठाणे, वाशी पोलीस ठाणे, कोपरखैरणे पोलीस ठाणे, एपीएमसी पोलीस ठाणे आदी ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष - २ पनवेल च्या पथकाने खांदेश्वर रेल्वे स्टेशन कडून खांदाकॉलनी सिग्नल कडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून त्याला जवळपास दिड लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.


                       गेल्या काही दिवसापासून मोबाईल चोरीच्या घटना मध्ये वाढ झाली होती याबाबत गुन्हे शाखा कक्ष - २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनील गिरी, पोहवा रमेश शिंदे, अनिल पाटील, तुकाराम सूर्यवंशी, मधुकर गडगे, सचिन पवार, रणजित पाटील, अजित पाटील, सागर रसाळ, दीपक डोंगरे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, जगदीश तांडेल, पो. ना. अजिनाथ फुंदे, पो.शी. संजय पाटील, विक्रांत माळी, नंदकुमार ढगे, अमोल मोहिते, म.पो. शी आदिती काकडे आदींच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली 

असता सदर आरोपी खांदेश्वर रेल्वे स्टेशन कडून खांदाकॉलनी सिग्नल कडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे हमजा काले खान उर्फ सुजित बंगाली (वय २१) रा.नावडे पुलाजवळ त्याला ताब्यात घेतले असता त्याने आत्ता पर्यंत ११ मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या कडून जवळपास दिड लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने