कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक

                                                     

 

महाराष्ट्राला लागली उत्सुकता; विजेत्या एकांकिकेस मिळणार ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक 

रविवारी बक्षिस महासोहळा; ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री मोहन आगाशे यांचा होणार गौरव; सिने व नाट्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची लाभणार मांदियाळी; 

 

पनवेल : दि.१२ डिसेंबर (4K News)एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने बहुमानाचा अटल करंडक यंदा कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरु असलेल्या दहाव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे.             उत्कृष्ट नियोजन, संयोजन, सर्वाधिक रक्कमेचे पारितोषिके आणि नवोदित कलाकारांना संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. त्या अनुषंगाने या स्पर्धेने यशाची उंची गाठली, त्यामुळे दरवर्षी या स्पर्धेची कलाकार आणि रसिक आतुरतेने प्रतिक्षा करत असतात.   पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरु आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. १० डिसेंबर ) सायंकाळी ०५ वाजता संपन्न होणार आहे.  या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार असून सन्माननीय उपस्थिती म्हणून गौरव रंगभूमी पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, लेखक व दिग्दर्शक राजन ताम्हाणे, अभिनेते लेखक व दिग्दर्शक संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते भरत सावले, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक स्पर्धेचे ब्रॅण्ड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे आदींची आदरणीय उपस्थिती असणार आहे.         तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दर्जेदार अशा २५ एकांकिकांची निवड करण्यात आली. त्यापैकी शुक्रवार व शनिवारी  १९ एकांकिका पार पडल्या तर उर्वरित एकांकिका रविवारी सादर होतील. या एकांकिकाचा आणि पारितोषिक वितरणाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ ठाकूर, अटल करंडक आयोजन कमिटी उपाध्यक्ष विलास कोठारी, स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी केले आहे. 

... रविवार १० डिसेंबरला सकाळी ०९ वाजल्यापासून या एकांकिकांचे होणार सादरीकरण  - रंगसंगती मुंबई (सुमित्रा),  एम.डी. कॉलेज मुंबई (पुंडलिका भेटी), खालसा महाविद्यालय, मुंबई (लोकल पार्लर), रेवन एंटरटेंमेंट, पुणे (हॅलो इन्स्पेक्टर), सीकेटी महाविद्यालय (स्वायत्त) नवीन पनवेल (काक्षी), ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे (उणिवांची गोष्ट).


 
थोडे नवीन जरा जुने