पनवेल दि. २७ (संजय कदम ) : अवैध्य रित्या मुक्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका इनोव्हा गाडीला आज सकाळी पनवेल जवळ अपघात होऊन या अपघातात तीन मुक्या जनावरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे .
पनवेल जवळील पनवेल ते जेएनपीटी मार्गावरील गावदेवी ढाब्या समोरून आज सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०२ सिबी ४२७९ वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीचा अपघात होऊन या गाडीत असलेली तीन मुकी जनावरे एक गाय व दोन म्हशी यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे . या अपघातानंतर गाडी चालक गाडी जागेवर सोडून पसार झाला आहे . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात गाडी चालका विरोधात आर्थिक फायद्याकरिता मुक्क्या जनावरांची वाहतूक ,प्राण्यांना निर्दयीपणे वागवणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
Tags
पनवेल